Article 32 Rafael Judgement
Article 32 Rafael Judgement सन्माननीय भारतीय राज्यघटनेच्या लेखांक (आर्टिकल) ३२ अनुसार नुकतेच माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर अपराधिक लेखादेश याचिका क्रमांक २२५/२०१८ चे आवेदन करण्यात आले होते. न्यायिक भाषेत प्रस्तुत याचिकेस मनोहरलाल शर्मा विरुद्ध नरेंद्र दामोदर दास मोदी या नावाने ओळखले जाते. प्रसिद्धपणे यास “राफेल जजमेंट” असे ओळखले जाते. उपरोक्त याचिके मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी एकूण २९ पानांमध्ये ३४ परिच्छेदात सविस्तर न्यायनिर्णय दिला आहे. माझ्या, आरजीएलएस तसेच राष्ट्र ऐक्य व्यासपीठच्या वाचकांच्या साठी प्रस्तुत न्याय निर्णया मधील माननीय सर्वोच्च न्यायालयाची ठळक निरीक्षणे खालील प्रमाणे: १. प्रस्तुत याचिका जनहित याचिकेच्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे. २. यातील संक्षेप खालील प्रमाणे: १. डीपीपी: डीफेन्स प्रॉक्योरमेंट प्रोसिजर २. एसक्यूआर: सर्विसेस कॉलिटेटीव्ह रिक्वायरमेंट्स ३. डीएससी: डिफेन्स ऍकिविझीषण काउंसिल ४. एमएमआरसीए: मिडीयम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट ५. ओईएम: ओरिजनल इक्विपमेंट मॅनुफॅक्चरर ६. एचएएल: हिंदुस्तान एरोनॉटिक्...