गाव नमुने तथा 7/12 पत्रक
गाव नमुने तथा 7/12 पत्रक
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 (महाराष्ट्र लॅण्ड रेव्हेन्यू कोड, 1966) अन्वये तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात. त्यात गाव नमुना नंबर 1 ते 21 असतात. या प्रत्येक नोंदवहीस वेगवेगळा अर्थ असतो. आपणास आवश्यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
अ. क्र.
गाव नमुना क्रमांक
तपशील
1.
1
जमिनीची नोंदवही (आकारबंद जमाबंदी मिश्र-शेतवार पत्रक): या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतीत माहिती असते.
2.
1अ
वन जमिनीची नोंद वही: या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
3.
1ब
बिन भोगवटयाच्या (सरकारी) वन जमिनीची नोंद वही: या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
4.
1क
भोगवटदार वर्ग 2 म्हणून मंजूर केलेल्या जमिनी आणि ग्रामपंचायतीकडे निहीत केलेल्या जमिनी यांची नोंद वही: या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. 7/12 च्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
5.
1ड
कुळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेच्या कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ यांच्या उपबंधानुसार अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या जमिनी दर्शविणारी नोंद वही: या नोंद वहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
6.
1इ
अतिक्रमण नोंद वही: या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
7.
2
अकृषिक महसुलांची नोंदवही: या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
8.
3
दुमाला जमिनीची नोंद वही: या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीची नोंद पाहता येते.
9.
4
संकीर्ण जमीन महसुलाची नोंदवही (सिवाई आमदनी--सिवाई जमावबंदी): या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
10.
5
क्षेत्र आणि महसूल यांचा सर्वसाधारण गोषवारा ( ठरावबंद-किस्ताबंदी खतावणी-जमाबंदी पत्रक): या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
11.
6
फेरफारांची नोंद वही: (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
12.
6अ
विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही: या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
13.
6ब
प्रकरणांची नोंदवही
14.
6क
वारसा प्रकरणांची नोंदवही: या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
15.
6ड
नवीन उप विभाग (पोट हिस्से) नोंदवही: या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
16.
7
7, 7अ, 12 गाव नमुना: (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराब, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
17.
7अ
कुळ वहिवाट नोंदवही: या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
18.
7ब
अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्ज्जात असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त जमीन कब्ज्जात असलेल्या इतर व्यक्तींची नोंदवही:
19.
8अ
धारण जमिनीची नोंदवही: या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
20.
8ब, 8क, 8 ड
ठराव बंदातील सव: बाबींचे येणे व वसुलीचे पत्रक: या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
21.
8क
मागण्या व वसुली यांच्या खातेवही आणि जमीन महसुला खेरीज इतर बाबी (उदा. बांधबंदिस्तीविषयक येणे रकमां व्यतिरिक्त पाटबंधारे विषयक येणे रकमा, पोट-हिस्सा भूमापन फी, विक्रीकर, आयकर इ.) यांचा चाचणी ताळेबंद यांची नोंदवही:
22.
8ड
तलाठ्याने / मंडल निरीक्षकाने वसूल केलेल्या सरकारी येणे रकमांची व इतर रकमांची रोख नोंदवही:
23.
9
दैनिक व जमा पुस्तक:
24.
9अ
शासनाला प्रदान केलेक्या रकमांच्या पावत्या: या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
25.
9ब
तलाठ्याने ठेवावयाची गाव नमुना 9 ची पावती पुस्तके व इतर यांच्या संग्रहाची नोंद वही:
26.
10
या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
27.
11
(पिकाची आकडेवारी): या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीक पहाणी व झाडांची माहिती मिळते.
28.
12 व 15
या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
29.
13
लोकसंख्या, गुरे व शेतकी अवजारे दर्शविणारी नोंदवही: या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
30.
14
पाणी पुरवठ्याची नोंद वही: या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणी पुरवठ्या बाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
31.
16
आवक जावक नोंद वही: या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
32.
17
प्रकरण प्रतिवृत्त: या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
33.
18
आवक-जावक नोंदवही मंडल निरीक्षक / मंडल अधिकारी यासाठी: या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
34.
19
तलाठी / मंडळ निरीक्षक / मंडळ अधिकारी यांच्या ताब्यात असलेल्या सरकारी मालमत्तेची नोंदवही: या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्ते बाबतची माहिती मिळते.
35.
20
तलाठी / मंडळ अधिकारी यांच्या करिता पोष्टाच्या सरकारी तिकिटांची नोंद वही: पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
36.
21
मंडल निरीक्षक / मंडल अधिकारी यांची मासिक दैनंदिनी: या नोंद वहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
Jeet
Advocate Ranjitsinh Ghatge 🦅
9823044282 / 8554972433 / 9049862433
info@rglegalservices.com
www.rglegalservices.com
Comments
Post a Comment