का सुटतात अपराधी?
का सुटतात अपराधी?
जामीना संदर्भात मूलभूत नियम असा आहे की, arrest is exception, bail is rule. त्यामुळे कोणाचेही व्यक्तिगत स्वातंत्र्य, अटक करत असताना, हिरावून घेत असताना माननीय न्यायालयाला खूप काळजी घ्यावी लागते.
केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तीला अपराधी ठरवता येत नाही आणि त्यावरून त्याला जेलमध्ये सुद्धा किंवा लॉकअप मध्ये सुद्धा पाठवता येत नाही.
जोवर एखादा आरोपित पोलीस यंत्रणेस तपास करण्यास सहकार्य करत आहे, तोपर्यंत त्याची पर्सनल लिबर्टी अर्थात व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेत असताना माननीय न्यायालय काळजी घेत असते.
जामीन होणे किंवा न होणे हा यातील विषय नाही. महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत:
१. पोलिसांनी सूक्ष्मपणे तपास करणे अपेक्षित आहे.
२. नागरिकांनी, जसे फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, अन्य साक्षीदार यांनी, त्यासाठी पोलीस/ तपास यंत्रणेस सर्वतोपरी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
३. पोलिसांनी संपूर्ण पुरावा योग्य पद्धतीने माननीय न्यायालय समक्ष सादर करणे अपेक्षित आहे.
४. माननीय न्यायालय समक्ष सूक्ष्मपणे सर्व कामकाज चालून सर्व जब जबाब, एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन, प्रूफ ऑफ डॉक्युमेंट्स इत्यादी निसंशयपणे मांडणे अपेक्षित आहे.
५. दोन्ही बाजूच्या वकिलांनी सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी माननीय न्याय यंत्रणेस सहकार्य करणे अपेक्षित आहे.
६. सर्व संबंधित फिर्यादी आणि साक्षीदार यांनी शेवटपर्यंत सत्याला धरून राहणे अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणासाठी सत्य सोडू नये हे अपेक्षित आहे. बऱ्याचदा साक्षीदार न्यायालय मध्ये आपले जाब जबाब फिरवतात आणि शिक्षा लागत नाहीत शिक्षा न लागण्याची कारण न्यायालय नसून असे बेत जबाबदार नागरिक आहेत जे न्यायालयात आपले साक्षी फिरवतात. पोलिसांसमोर एक जबाब देतात आणि न्यायालयात वेगळा जबाब देतात जो आरोपीला पाठीशी घालणार असतो या कारणामुळे विशेषता गुन्हेगार सुटतात हे आपण समजून घ्यावे.
७. सर्वात शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायाधीशांनी कंटाळा न करता अभ्यासपूर्ण पद्धतीने दोन्ही बाजू ऐकून घेऊन स्वतःचा व्यवस्थित वेळ देऊन या कामी न्याय निर्णय करावा.
८. या सर्वांसाठी न्यायपालिकेने अत्यंत अभ्यासू वकील, न्यायाधीश आणि पोलीस तपास अधिकारी निर्माण करण्याच्या कार्यामध्ये आपला वेळ आणि पैसा खर्च करावा.
आपल्यासारख्या जागरूक नागरिकांमुळे कधीकधीच अशा पोस्ट करण्याची संधी मिळते.
Jeet
Advocate Ranjitsinh Ghatge 🦅
9823044282 / 8554972433 / 9049862433
Comments
Post a Comment