का सुटतात अपराधी?
का सुटतात अपराधी? जामीना संदर्भात मूलभूत नियम असा आहे की, arrest is exception, bail is rule. त्यामुळे कोणाचेही व्यक्तिगत स्वातंत्र्य, अटक करत असताना, हिरावून घेत असताना माननीय न्यायालयाला खूप काळजी घ्यावी लागते. केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तीला अपराधी ठरवता येत नाही आणि त्यावरून त्याला जेलमध्ये सुद्धा किंवा लॉकअप मध्ये सुद्धा पाठवता येत नाही. जोवर एखादा आरोपित पोलीस यंत्रणेस तपास करण्यास सहकार्य करत आहे, तोपर्यंत त्याची पर्सनल लिबर्टी अर्थात व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेत असताना माननीय न्यायालय काळजी घेत असते. जामीन होणे किंवा न होणे हा यातील विषय नाही. महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत: १. पोलिसांनी सूक्ष्मपणे तपास करणे अपेक्षित आहे. २. नागरिकांनी, जसे फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, अन्य साक्षीदार यांनी, त्यासाठी पोलीस/ तपास यंत्रणेस सर्वतोपरी सहकार्य करणे अपेक्षित आहे. ३. पोलिसांनी संपूर्ण पुरावा योग्य पद्धतीने माननीय न्यायालय समक्ष सादर करणे अपेक्षित आहे. ४. माननीय न्यायालय समक्ष सूक्ष्मपणे सर्व कामकाज चालून सर्व जब जबाब, एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन,...