अनुच्छेद 370
अनुच्छेद 370 (0) 25 जानेवारी 1957 विषयाला प्रवेश करण्यापूर्वी 25 जानेवारी 1957 ला नेमके काय घडले याविषयी जाणून घेणे आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. 370 अनुच्छेद भारतीय राज्यघटनेमध्ये जम्मू आणि काश्मीर तसेच लड्डाख, अति उत्तरी प्रदेश, ट्रान्स कोराकोरम ट्रॅक्ट आणि अक्साई चीन या भागाकरिता लागू होते. 370 अनुच्छेदामध्ये सरळ सरळ नेहरू शासनाच्या सूचनेवरून एन. गोपालस्वामी अय्यंगार यांनी असे प्रावधान केले होते की केवळ राज्य शासनाच्या संमतीनेच भारतीय राज्यघटनेतील प्रावधाने जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात येतील. या संदर्भात संपूर्ण अधिकार जम्मू काश्मीर शासनाला असेल. जम्मू कश्मीर शासन भारतीय राज्यघटनेमधील कोणता भाग जम्मू-काश्मीरला लागू होणार आणि कोणता नाही हे ठरवू शकेल. तसेच 370 वा अनुच्छेद अस्तित्वात राहील की संपुष्टात येईल हे सुद्धा जम्मू कश्मीर शासन ठरवेल. अशी परिस्थिती असताना तत्कालीन जम्मू कश्मीर शासनाने अर्थात कॉन्स्टिट्यूअंट असेंबलीने 370 अनुच्छेद संदर्भात कोणताही निर्णय न घेता, त्या संदर्भात भारत शासनाला, राष्ट्रपतींना कोणत्याही स्वरूपाची शिफारस न करता या दिवशी राज्य शासन बरखास्त करून टाकले. ...